Amol Kolhe: Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाइन; ‘हे’ आहे कारण – ncp mp amol kolhe goes into home quarantine

0
27
Spread the love

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ( NCP MP Amol Kolhe Home Quarantine )

वाचा: ‘कोणाचा मंत्री कुठे फिरतोय हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसतं’

अमोल कोल्हे १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात संपर्क आलेल्या दोन नेत्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत माहिती मिळताच कोल्हे यांनी तातडीने स्वत:ची करोना चाचणी करून घेतली असून या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतरही त्यांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.

वाचा: चिंता नको! हवेतून पसरणाऱ्या करोनाचा खात्मा करणार ‘एअर फिल्टर’

‘मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय येथे संपर्क करू शकता’, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

वाचा: CM ठाकरेंचा पुण्याच्या महापौरांना फोन; दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

दरम्यान, पुणे जिल्ह्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ३० हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्यात पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण असून ग्रामीण भागातही संसर्ग पसरला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच यंत्रणा झोकून देऊन काम करत आहेत. त्यात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीही प्रशासनाला साथ देत आहेत. त्यातून आढावा बैठका, मतदारसंघात भेटीगाठी, रुग्णालयांची पाहणी करावी लागत असल्यामुळे लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही करोनाने गाठले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनाच अधिक खबरदारी घेण्याची गरज असून आपल्यामुळे दुसऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या हेतुनेच अमोल कोल्हे क्वारंटाइन झाले आहेत.

वाचा: चांगली बातमी! करोनाच्या ‘या’ घटकाचा शोध, उपचारात मदत होणार

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)