anushka sharma vogue photoshoot virat kohli commented on her photos ssj 93 | अनुष्काच्या ‘बोल्ड’ लूकने काढली विराटची विकेट!

0
25
Spread the love

सध्या देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीदेखील घरीच आहेत. मात्र या काळतही अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या वेबसीरिजमुळे चर्चिली जात होती.मात्र यावेळी ती एका फोटोशूटमुळे आणि त्यावर पती विराट कोहलीने दिलेल्या कमेंटमुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या अनुष्काने काही दिवसांपूर्वी तिच्या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिने वोग मासिकासाठी हे फोटोशूट केलं होतं. त्यामुळे यातील काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच विराटच्या कमेंटमुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.

अनुष्काचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विेशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे. विराटने अनुष्काच्या प्रत्येक फोटोवर फायर, हार्ट आणि स्माइलीच्या काही इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

दरम्यान, अनुष्का सध्या या फोटोंमुळे जरी चर्चेत येत असली, तरीदेखील काही दिवसांपूर्वी ती तिच्या ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. या सीरिजच्या माध्यातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोन्ही सीरिज अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती आहेत. या दोन्ही वेब सिरिजला नेटकऱ्यांची चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 1:14 pm

Web Title: anushka sharma vogue photoshoot virat kohli commented on her photos ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)