ashok khairnar: Ashok Khairnar: मुंबईत करोनाला पहिली वेसण खैरनार यांच्या वॉर्डात; ‘हे’ आकडे थक्क करणारे – ashok khairnar’s ward leads the fight against coronavirus

0
28
Spread the love

मुंबई: रुग्ण दुपटीचा कालावधी १३४ दिवसांवर…रुग्णवाढीचा सरारसी वेग अवघा ०.५ टक्के…हे आकडे आहेत मुंबई पालिकेच्या एच/पूर्व विभागातील. पालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्या बिनतोड नियोजनामुळेच देशात करोना विरुद्ध बहुदा सर्वात उत्तम कामगिरी या विभागाने बजावली. या कारगिरीचा नायक म्हणजेच सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना मात्र करोनामुळेच प्राणास मुकावे लागले आहे. ( BMC AMC Ashok Khairnar Dies )

वाचा: मुंबई पालिकेला धक्का; सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा करोनाने मृत्यू

मुंबई महानगरपालिकेच्या एच/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार (वय ५७) यांचे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असताना आज निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

अशोक खैरनार यांनी करोना विरुद्ध लढाईत झोकून देऊन काम केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २४ प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.५ % असा मुंबईतच नाही तर कदाचित देशात देखील सर्वोत्तम आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये खैरनार यांचा मोठा वाटा होता.

वाचा: बापट भडकले; ३ टक्के लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता?

ऑफीसर ऑफ द मंथ…

धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि ‘आय. आय. टी. पवई’ या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. खैरनार हे फेब्रुवारी १९८८ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी २०१८ पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून अशोक खैरनार यांना तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते जानेवारी २०१९ साठी ‘ऑफीसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.

वाचा: घरगुती गणेशमूर्तीवर दोन फुटांचे बंधन; सरकारच्या १२ सूचना

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)