Asia cup: मोठी बातमी.. आशिया चषक रद्द; सौरव गांगुलीने केली घोषणा – asia cup has been cancelled, said bcci president sourav ganguly

0
20
Spread the love

करोना व्हायरसचा मोठा फटका पुन्हा एकदा क्रिकेटला बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आता करोना व्हायरसमुळे आशिया चषक स्पर्धाही रद्द करण्यात आली असल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली आहे.

आशिया क्रिकेट कौन्सिलची एक महत्वाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीपूर्वीच आशिया चषक रद्द होणार असल्याचे गांगुलीने सांगितले आहे. गांगुलीच्या या घोषणेमुळे काही जणांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पण भारतीय क्रिकेटपटू एवढ्या लवकर मैदानामध्ये उतरण्यास तयार नसल्याचे गांगुलीने सांगितले आहे.

maharashtra times

सौरव गांगुली

याबाबत गांगुलीने सांगितले की, ” आशिया चषक स्पर्धा ही रद्द करण्यात येत आहे. कारण सध्याच्या घडीला कोणतीच तयारी आम्ही सुरु केलेली नाही. सरकारच्या नियमांनुसारच आम्ही क्रिकेटच्या तयारीला लागणार आहोत. त्यामुळे भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका कधी खेळवण्यात येईल, हे अजूनही माहिती नाही. आम्हाला खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही मैदानात उतरण्याची कोणतीही घाई करणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत.”

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले होते. पण भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा खेळवण्यासाठी श्रीलंकेचा पर्याय निवडण्यात येणार होता. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळानेही ही स्पर्धा घेण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे समजते. त्यामुळे आता ही स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

maharashtra times

सौरव गांगुली

ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे. पण याबाबत अमिरातीच्या क्रिकेट मंडळाने कोणतेही अधिकडत विधान केलेले नाही. त्यामुळे आशिया चषक खेळवायचा कुठे, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर करोना व्हायरसचे संकटही अजून कायम असल्यामुळे ही स्पर्धा रद्द करावी, असा बीसीसीआयचा मानस आहे.

आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यात आली तर आयपीएलचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे बरेच जणांना वाटत आहे. त्यामुळे आता आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल नेमका काय निर्णय घेते, यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)