babasaheb ambedkar house: Babasaheb Ambedkar मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’वर दगडफेक, तोडफोड – stone pelting at babasaheb ambedkars rajgruha residence

0
23
Spread the love

मुंबई: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ‘राजगृह‘ या निवासस्थानावर दगडफेक करण्यात आल्याने तसेच तेथील कुंड्यांची तोडफोड करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ( Babasaheb Ambedkars Rajgruha Residence )

दादर हिंदू कॉलनी येथे ‘राजगृह’ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून आज सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तांनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली आहे. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले असून संबधित माथेफिरू हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी राजगृह या निवासस्थानाचे मोठे महत्त्व आहे. या घरात पुस्तकांचे मोठे संग्रहालय असून राज्यातून व देशभरातून मुंबईत येणारे बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी राजगृहला भेट देत असतात. असे असताना आज घडलेल्या घटनेने बाबासाहेबांचे अनुयायी संतप्त झाले आहेत. ‘ वंचित बहुजन आघाडी ‘च्या अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन वंचितकडून करण्यात आले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)