Bachchan family: Bachchan Family: जया बच्चन यांच्यासह ऐश्वर्या, आराध्याचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह – aishwarya rai bachchan jaya bachchan test negative for covid 19

0
20
Spread the love

मुंबई: मुंबईसह राज्यात थैमान घालणाऱ्या करोना ससंर्गाने अमिताभ बच्चन यांच्या घरात शिरकाव केल्यानंतर सारेच हादरले आहेत. अमिताभ यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाठोपाठ पुत्र अभिषेकलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने काळजी वाढली. मात्र, त्यानंतर काहीसा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. ( Aishwarya Rai Bachchan Jaya bachchan Test Negative )

वाचा: अमिताभ बच्चन यांना करोना; मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल

अमिताभ व अभिषेक यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने बच्चन कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला आहे. कुटुंबातील इतर सदस्य व स्टाफचा स्वॅब चाचणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, अमिताभ यांना हलका ताप होता. त्यानंतर त्यांनी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर अमिताभ यांना उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

वाचा: अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चनही करोना पॉझिटिव्ह

अमिताभ यांच्यासाठी देशाची प्रार्थना

अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याने त्यांचे लाखो चाहते काळजीत पडले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वत: आपल्या आजारपणाबाबत माहिती देत संभ्रम वाढू दिलेला नाही. अमिताभ यांना शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही तासांनी रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी ट्विट केलं व तपशील दिला. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं आहे. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली आहे. अमिताभ यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच अभिषेक बच्चनचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त धडकले. दरम्यान, बच्चन कुटुंबीयांवर करोनाचं संकट कोसळल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी अमिताभ यांना लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना केली.

वाचा: गेट वेल सून; अमिताभ यांच्या काळजीने चाहते व्याकूळ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)