Balasaheb Thorat राज्यातील आणखी एका मंत्र्याच्या घरात करोनाचा शिरकाव झाला अन् – Balasaheb Thorat Quarantines Self After Office Staffer Tests Covid 19 Positive

0
31
Spread the love

नगर: स्वत:च्या मतदारसंघासह राज्यातील करोना विरोधी लढ्यात सहभागी असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील बंगल्यापर्यंत करोना पोहचला आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानी काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे थोरात यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असल्याचे सांगण्यात आले. ( Balasaheb Thorat Home Quarantine )

वाचा: फेरीवाल्यांमुळे करोना पसरेल; परवानगी देणार नाही: राज्य सरकार

बाळासाहेब थोरात यांच्या टेलिफोन ऑपरेटरला करोनाची लागण झाल्यानंतर बंगल्यावरील अन्य कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या अन्य वीस जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. थोरात सध्या मुंबईतच आहेत. दक्षता म्हणून त्यांनी स्वत:ला तेथेच विलग केले आहे. आता अहवालाची प्रतीक्षा आहे.

थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यातही करोनाचा उद्रेक वाढता आहे. त्यामुळे मुंबईत थांबून राज्यभराचा कारभार पाहण्यासोबतच त्यांना संगमनेरमध्येही लक्ष घालावे लागत आहे. संगमनेर तालुक्यात सुरुवातीपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. आतापर्यंत तेथे १५४ करोना बाधित आढळून आले आहेत तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात आतार्पंत १७ जणांचा करोनामुळे मत्यू झाला असून त्यात सर्वाधिक बारा मृत्यू एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १०२ जण करोनामुक्त झाले असून सध्या ४० जणांवर उपचार सुरू आहेत. करोनाच्या आकडेवारीत नगर शहरानंतर संगमनेरचा क्रमांक लागतो आहे. त्यामुळेच गुरुवारी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ संगमनेरला येऊन आढावा बैठक घेणार आहेत.

वाचा: साईबाबा मंदिर उघडल्यावर आता दर्शनासाठी ‘हे’ असतील नियम

संगमनेरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून थोरात यंत्रणेच्या संपर्कात राहून काम करीत आहेत. संगमनेर नगरपालिका त्यांच्याच ताब्यात असून त्यांच्या भगिनी नगराध्यक्षा आहेत. त्यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार आहेत. या सर्वांनी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या. स्थानिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून काम सुरू ठेवलेच आहे. थोरात स्वत: कधी संगमनेर तर कधी मुंबईत थांबून कामात व्यस्त आहेत. मतदारसंघातील दंडाकारण्य अभियानाचा कार्यक्रम आटोपून नुकतेच ते मुंबईला गेले होते.

राज्यात करोना उपाययोजनांसाठी व्यस्त असलेले अधिकारी-कर्मचारी आणि नेत्यांपर्यंत करोना पोहचला आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे या तीन मंत्र्यांना करोनाची लागण होऊन नंतर ते त्यातून बरेही झाले आहेत. तर आणखी काही अती महत्त्वाच्या नेत्यांचे कर्मचारी अगर संपर्कात असणाऱ्यांपर्यंत करोना पोहचल्याचीही उदाहरणे आहेत. नगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारालाही करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मतदारसंघातील प्रश्नांसंबंधी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यातून एका बाधिताकडून त्यांना लागण झाल्याचे सांगण्यात येते.

वाचा: …म्हणून राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक गळाला लावले!

एका बाजूला करोनाच्या उपाययोजना, त्यासंबंधीची आकडेवारी यावरून राजकारण सुरूच आहे. तर दुसरीकडे सामान्यांसोबतच करोनाशी लढणाऱ्या यंत्रणेला धोका वाढत आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)