BEST electricity bill: Mumbai BEST Bill वीजबिलांच्या गोंधळात एक ‘बेस्ट’ निर्णय; मुंबईकरांना मिळणार दिलासा – best will refund the excess amount of electricity bill to customers

0
29
Spread the love

मुंबई: बेस्ट उपक्रमाने लॉकडाऊन मध्ये प्रत्यक्ष वीजमीटर मोजणी न करता सरासरी अंदाजित वीजबिल आकारल्याने घरगुती, औद्योगिक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलांचा शॉक बसला. त्यामुळे उपक्रमाने वीज बिलापोटी आकारलेली जादा रक्कम व्याजासह परत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच, सरासरीपेक्षा जास्त बिले आलेल्यांसह ज्यांना बिलाची सर्व रक्कम एकदम भरता येणार नाही, त्यांनाही तीन महिने मुदतवाढीच्या घोषणेत सामावून घेतले आहे. ( Mumbai Best Electricity Bill )

करोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच लागू केलेल्या लॉकडाऊननंतर बेस्टच्या विद्युत विभागाने वीजबिलासाठी मार्चच्या बिलाचा आधार घेतला. त्या बिलाच्या आधारावर नंतरच्या महिन्यातील बिले काढण्यात आली. दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल, मे, जूनमध्ये विजेचा वापर वाढत जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे घरगुती विजेच्या वापरात आणखीनच भर पडली आहे. मात्र, वीज मीटर रीडिंग न झाल्याने मार्चच्या बिलानुसार सरासरी अंदाजित बिले काढण्यात आली आहेत. मात्र, सध्या अनेक कार्यालये, उद्योग व्यवसाय, व्यावसायिक कार्यालयांतील विजेचा वापर कमी झाला आहे.

इतर वीज कंपन्यांकडून वीजबिलाबाबत सुरू गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बेस्टने वीज बिलासाठी घेतलेली जादा रक्कम व्याजासह परत देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. ही रक्कम लवकरच ग्राहकांच्या खात्यात जमा होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी रकमेचे बिल असल्यास, त्यांना व्याजासह तीन समान मासिक हप्त्यात रक्कम भरण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तर, कमी रक्क्मेची बिले आली असल्यास प्रत्यक्ष वापरावर बिल पाठविले जातील.

मीटर रीडिंग सुरू

उपक्रमाने रेड झोन वगळता इतरत्र मीटर रीडिंग सुरू केले आहे. परिणामी आता प्रत्यक्ष वापरानुसार बिले आकारली जाणार आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)