Bhushan Kumar announces a new movie starring Prabhas and Pooja Hegde | #Prabhas20 : प्रभास करणार पूजा हेगडेसोबत रोमान्स

0
24
Spread the love

‘बाहुबली’ या चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेला अभिनेता प्रभास आता लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली आहे. प्रभासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत याविषयीची माहिती दिली. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘प्रभास २०’ या हॅशटॅगने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

येत्या १० जुलै रोजी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधा कृष्ण कुमार हे तेलुगू दिग्दर्शक या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : “होय, आपण त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बांधिल आहोत कारण…”; मनोज वाजपेयीने बॉलिवूडला सुनावलं

याआधी प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता टी-सीरिजसारख्या मोठ्या निर्मिती कंपनीसोबत प्रभासचा आगामी चित्रपट येतोय. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:12 pm

Web Title: bhushan kumar announces a new movie starring prabhas and pooja hegde ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)