big boss fame anil thatte found corona positive shares video gave information hospitalizes stable condition | बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना करोनाची लागण

0
16
Spread the love

गेल्या काही दिवसापासून देशात आणि राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तसंच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनंही सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील नेतेमंडळींनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

“सध्या मी रुग्णालयात असून मला करोनाची लागण झाली आहे,” असं अनिल थत्ते म्हणाले. गेले अनेक दिवस करोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. परंतु आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर करोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता करोनाची भीती संपली. तसंच करोना सोबत मधुमेह वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं,” असं ते म्हणाले. तसंच आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शुक्रवारी राज्यात ६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण

शुक्रवारी महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. तर मागील १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. तसंच आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 8:26 am

Web Title: big boss fame anil thatte found corona positive shares video gave information hospitalizes stable condition jud 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)