BJP Leader Shot Dead By Terrorists In J&K, His Security Cover Was Missing | जम्मू काश्मीरमधील बंदीपोरामध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा नेत्याची हत्या

0
21
Spread the love

जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडिल आणि त्यांचा भाऊ यांना गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्ता वसीम बारी यांच्यावर गोळीबार केला. अंदाधुंद केलेल्या गोळीबारात वसीम बारी, त्यांचे वडिल बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.

शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि आपल्या कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांच्यानजीक कोणीही नव्हतं. तसंच सुरक्षा रक्षकही उपस्थित नव्हता. वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य योग्यरित्या न बजावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

“वसीम यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आठ सदस्यीय सुरक्षा टीम पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं,” अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं जम्मू काश्मीरचे पोलीस डीजीपी दिलबाग सिंग यांच्या हवाल्यानं दिली. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील शोक व्यक्त केला. तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. “बांदीपोरामध्ये भाजपा नेते वसीम बारी आणि त्यांच्या भावाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे आम्हाला दु:ख झालं आहे. ८ सुरक्षा रक्षक असतानाही अशी घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं राम माधव म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 7:36 am

Web Title: bjp leader shot dead by terrorists in jk his security cover was missing jud 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)