bjp mp tested positive: भाजप खासदाराला करोना; कुटुंबातील ८ जणांचाही अहवाल पॉझिटिव्ह – bjp mp kapil patil tested corona positive

0
23
Spread the love

भिवंडीः राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता नेतेही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरातील आठ सदस्यांचेही करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (BJP mp tested positive)

खासदार कपिल पाटील यांना करोनाची सौम्य लक्षणे असल्यानं घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर, पाटील यांच्यासह पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांना घरातचं क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ‘ही’ आहेत कारणे

काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर, पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईलाही करोना झाला होता.

‘धान्य, भाजीपाला आत्ताच घेऊन ठेवा; नंतर काहीही मिळणार नाही’

दरम्यान, ठाण्यात करोनाचा विळखा घट्ट होताना दिसतोय. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा ठाणे महापालिकेनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात आधीच १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून हा लॉकडाऊन आता १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)