break the rules of the corona lockdown Bribe taken by police from tempo driver for unauthorized entry aau 85 |नियमांची ऐसीतैशी; विनापरवाना जिल्हा प्रवेशासाठी टेम्पोचालकाकडून पोलिसाने घेतली लाच

0
17
Spread the love

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असताना सातारा जिल्ह्यात विनापरवाना प्रवेशासाठी टेम्पो चालकाकडून लाच स्विकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी दहा हजार रुपयांची घेतल्याप्रकरणी या दोन्ही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही कारवाई केली.

सातारा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले आणि पुणे-बंगळुरु महामार्गावर सध्या शिरवळ येथील शिंदेवाडी चेकपोस्टवर तैनात केलेले हवालदार जी. एन. घोटकर, तर फलटण पोलीस ठाण्यातील गुलाब गलियाल अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. ११ जून रोजी पुण्याहून एक टेम्पो सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येत होता. यावेळी शिंदेवस्ती चेकपोस्ट परिसरात हवालदार घोटकर कर्तव्यावर होते. या टेम्पो चालकाकडे जिल्ह्यात येण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या टेम्पोची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कुलर होता. टेम्पोतील तो कुलर द्या आणि शिरवळकडे जा, असे सांगून घोटकर यांनी टेम्पोला विनापरवाना साताऱ्याच्या हद्दीत सोडले होते.

तर पोलीस नाईक गुलाब गलियाल हे फलटण पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. २२ जून रोजी त्यांच्याकडे एका बेपत्ता प्रकरणाचा तपास होता. याप्रकरणी गलियाल तक्रारदारांना भेटले आणि तुमची बेपत्ता शोध घेतो असे सांगून १० हजार रुपये घेतले.

दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे चौकशी अहवाल पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर त्याबाबत प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घोटकर आणि गलियाल या दोघांना निलंबित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 9:27 pm

Web Title: break the rules of the corona lockdown bribe taken by police from tempo driver for unauthorized entry aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)