british pm Boris Johnson appeals to leave home without fear zws 70 | घराबाहेर पडण्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे आवाहन

0
27
Spread the love

लंडन : करोना टाळेबंदीतून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न ब्रिटनचे सरकार करीत आहे. आधी होते तसे नेहमीचे जीवन जगायला सुरुवात करा, पुन्हा एकदा कामाला लागा, असे आवाहनच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशवासीयांना केले आहे.

‘लोकांचे पंतप्रधानांना प्रश्न’ (पीएमक्यू) या समाजमाध्यमांवरील उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना जॉन्सन यांनी नागरिकांना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला. अर्थात करोना टाळण्यासाठीच्या व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखणे आदी उपाययोजनांचे पालन करण्याचे स्मरण करून देत त्यांनी हे आवाहन केले.   ते म्हणाले की, ‘‘आता लोकांनी सावधपणे पुन्हा आपल्या कामावर परतणे योग्य ठरणार आहे. जर तुमची कंपनी करोना टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत असेल, तेथे सुरक्षितता असेल, तर तुम्ही पुन्हा कामावर जायला सुरुवात केलेली बरी. अधिकाधिक लोकांना निर्धास्तपणे बाजारात, उपाहारगृहांमध्ये जावेसे वाटले पाहिजे, असे मला वाटते.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 1:47 am

Web Title: british pm boris johnson appeals to leave home without fear zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)