Chandrakant Patil Reaction on sanjay Raut statement about Maharashtra Govt bmh 90 । “दोन मित्र अंधारातून चालताना धीर देतात, भूत बित काही नाही बरका”; संजय राऊतांना चंद्रकांत पाटलांचा चिमटा

0
28
Spread the love

राज्यात सरकारच्या अस्थिरतेबद्दलच्या चर्चा अधूनमधून डोकं वर काढताना दिसत आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीच्या अनुषंगानं आज पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यातील सरकारविषयी भाष्य केलं. राज्यातील सरकार पडणार नाही. पाच वर्ष काम करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थितीसह विविध मुद्यांवर भूमिका मांडली. त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या सरकार अस्थिरतेच्या चर्चांवरही भाष्य केलं. सरकार पाच वर्ष काम करेल या संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना पाटील म्हणाले,”कोण म्हणतंय तुमचं सरकार पडणार आहे म्हणून… दोन मित्र अंधारातून जात असताना एकमेकांना धीर देतात. भूत बित काही नाही बरका. असंच सध्या चाललंय,” असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काढला.

काय म्हणाले होते राऊत?

“१५जूनला राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची मुदत संपलेली आहे. घटना पाळत असू, जी देव व धर्मापेक्षा महत्त्वाची आहे, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्या बाळासाहेब ठाकरे यांचा मी चेला आहे. मला असं वाटत हा देश आणि राज्य घटनेनुसार चालावं. घटनेनं जे अधिकार लोकनियुक्त सरकारला दिले आहेत. घटनेनं जे अधिकार संसदेला आणि दोन्ही सभागृहांना दिले आहेत. त्या अधिकारांचं हनन होऊ नये. ते अधिकार पायदळी तुडवून नये. जी परंपरा आहे, ती पुढे चालू राहावी, त्यासंदर्भात आघाडी सरकार व राज्यपालांमध्ये चर्चा सुरू आहे,” असं सांगत एका लेखात सरकार अस्थिरतेविषयी बोलताना म्हणाले,” मला जे वाटत. जे दिसत ते मी लिहितो. माध्यमांना असं षडयंत्र दिसत असेल तर समोर आणावं,” असं राऊत म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 6:24 pm

Web Title: chandrakant patil reaction on sanjay raut statement about maharashtra govt bmh 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)