China took incredibly aggressive actions India did best to respond foreign minister Mike Pompeo on LAC face off ladakh | “चीनच्या आक्रमकतेला भारताने सर्वोत्तम उत्तर दिलं”; अमेरिकेकडून शाब्बासकी

0
17
Spread the love

चीनच्या आक्रमकतेला भारतानं सर्वोत्तम उत्तर दिल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. “प्रादेशिक वादावरून चिथावण्याकडे चीनचा अधिक कल आहे आणि जगाने त्यांना हे कृत्य करू देऊ नये. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी मी (चीनच्या आक्रमक कारवायांबद्दल) अनेकदा संपर्क साधला आहे. चीनकडून अनेकदा आक्रमक कारवाया करण्यात आल्या. परंतु भारतानंही त्यांना सर्वोत्तम उत्तर दिलं,” असं मत पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं.

लडाखमधील चीननं केलेल्या घुसखोरीवर पॉम्पिओ यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनीही योग्य कारवाई करत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं.

“चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आक्रमक वृत्तीच्या विशेष घटनेकडे स्वतंत्रपणे पाहणं शक्य होईल असं मला वाटत नाही. याकडे सर्वांनी व्यापक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे,” असंही पॉम्पिओ यावेळी म्हणाले. ग्लोबल एनवॉयरमेंटर फॅसिलिटच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही भूतानच्या अभयारण्यावरही चीननं आपला दावा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 7:57 am

Web Title: china took incredibly aggressive actions india did best to respond foreign minister mike pompeo on lac face off ladakh jud 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)