chinchpokli cha chintamani: यंदा ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची मूर्ती घडवणार नाही, मंडळाचा ऐतिहासिक निर्णय – chinchpokli cha chintamani’, cancelled ceremonies related to the ‘paat poojan’

0
23
Spread the love

मुंबईः करोना संसर्गाच्या धोक्यामुळं यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहे. अनेक छोट्या- मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, चिंचपोकळी सार्वजनिक मंडळानं यंदाचा गणेश आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. नागरिकांचे आरोग्य व पोलिसांवरील भार हलका व्हावा यासाठी यंदा मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश सीताराम नाईक यांनी दिली आहे.

यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानं (चिंचपोकळीचा चिंतामणी) १०१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं चिंतामणीचा आगमन सोहळा, पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केलं होतं. पोलीस यंत्रणा, जनतेचं आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करून मंडळानं यंदा गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसंच मंडळानं यंदाचं हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर,आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद्र, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि १०१ कोविड योद्धयांचा सन्मान, असे आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसंच, मंडळाकडून या वर्षी मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधून तेथे विभागातील घरगुती गणेश मूर्तीना विसर्जनासाठी उपलब्ध करून देणार आहे.

मागील वर्षी मंडळाकडून पश्चिम महाराष्ट्र, कोकणात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत व आताच्या करोना संकटात मंडळानं रु. ५,००,००० व रु. ३,५१,००० मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मंडळाकडून अर्सेनिक अल्बम -३०च्या गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलं.

ऑनलाइन दर्शन!

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदारांव्यतिरिक्त इतर भाविकांना प्रत्यक्षस्थळी येऊन मुखदर्शन घेता येणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदारांना देखिल नियोजनानुसार ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे उत्सवकाळात चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)