Chinese city on high alert after suspected case of Bubonic plague | करोनानंतर आता ब्यूबॉनिक प्लेगचा धोका; चीनने जारी केला अलर्ट

0
28
Spread the love

जगभरामध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर शहरामधील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचं म्हटलं आहे. मात्र प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसऱ्या स्तरावरील इशारा दिला आहे. ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा २०२० च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे. “सध्या शहरामध्ये प्लेगचा संसर्ग होण्याची भिती आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी जतनतेने जागृक राहणं गरजेचं आहे. नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यासंदर्भातील काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देणं गरजेचं आहे,” असं बयन्नुरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सरकारी वृत्तसंस्थेने १ जुलै रोजी दिलेल्या वृत्तामध्ये पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतामध्ये ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आल्याचे नमूद करण्यात आलं होतं. या रुग्णांना झालेला संसर्ग हा ब्यूबानिक प्लेगचाचा असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यानंतर स्पष्ट झालं होतं.

दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनासंदर्भात चीनने महिती लपवून ठेवल्याने, फसवणूक केल्याने आणि आकडेवारी लपवल्याने जगभरामध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात चीनने स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “सध्याच्या परिस्थितीसाठी पूर्णपणे चीनच जबाबदार आहे,” असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 9:29 am

Web Title: chinese city on high alert after suspected case of bubonic plague scsg 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)