corona virus update: काळजी घ्या! देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ लाखांच्या पुढे – covid 19 corona virus cases in india crosses 8 lakh mark

0
27
Spread the love

नवी दिल्ली: भारतात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढतच चालला आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी करोनाचा संसर्ग झालेल्या बाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेला आहे. आज शुक्रवारी नव्या रुग्णांच्या संख्यने मागील विक्रम मोडले असून आज २६ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या वाढून ती ८ लाख १ हजार २८६ इतकी झाली आहे. तर करोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रात एकूण २ लाख ३० हजार ५९९ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार २६१ इतकी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये २६ हजार ५०६ नवे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात ही सर्वाधिक वाढ आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळी करोनाबाधितांची संख्या वाढून ती ७ लाख ९३ हजार ८०२ पर्यंत पोहोचली होती. तर गेल्या २४ तासांमध्ये ४७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच आतापर्यंत एकूण २१,६०४ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच रुग्ण बरे होण्याचा दरही ६२.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. या बरोबरच या विषाणूवर एकूण ४,९५५१३ रुग्णांनी मात केली आहे.

करोनाचा वाढता संसर्ग पाहता १३ ते २३ जुलैपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये व्यापक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये करोनाबाधित रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊन दरम्यान केवळ दूध, औषधांची दुकाने, क्लिनिक आणि अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

maharashtra times

करोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

वाचा: करोनावरील लस खरोखर कधी येणार?; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ उत्तर

तामिळनाडूची राजधानी चेन्नईत राज्याच्या तुलनेत ५८.२ टक्के रुग्ण आहेत. चेन्नईत मात्र रुग्णसंख्येत घट दिसत आहे. मदुराईत गेल्या १६ दिवसांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये पाच पट वृद्धी पाहायला मिळाली.

वाचा: करोना Live: सीमा सुरक्षा दलात गेल्या २४ तासात ७३ जवानांना करोना
उत्तर प्रदेशात देखील राज रात्री १० वाजल्यापासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणसह ८ राज्यामध्ये देशातील ९० टक्के करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. देशातील एकूण ४९ जिल्ह्यांमध्ये ८० टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

वाचा: करोना: केंद्र सरकारने ‘या’ वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून हटवल्या

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)