coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २१९ करोनाबळी; आणखी ४०६७ रुग्ण बरे होऊन घरी – 6,875 new covid19 cases 219 deaths reported in maharashtra today

0
23
Spread the love

मुंबई: राज्यात करोना संसर्गामुळे मृत्यूचे तांडव सुरूच असून आज दिवसभरात आणखी २१९ जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ९६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एका राज्यातील हे सर्वाधिक करोनामृत्यू आहेत.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून करोना साथीने हाहाकार उडवला आहे. करोना बाधितांचा आकडा नेहमीच चढता राहिला आहे. राज्यात आज ६८७५ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहचली आहे. त्यात ९३,६५२ इतकी अॅक्टिव रुग्णांची संख्या असून या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारी करोना बाधित २१९ रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात ६८७५ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ६८, ठाणे शहरात २०, कल्याण डोंबिवलीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला.

आजचे ठळक अपडेट्स…

– आज ४०६७ रुग्ण बरे होऊन घरी , राज्यात आजपर्यंत एकूण १,२७,२५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.१९% एवढे झाले आहे.
– आज राज्यात ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले.
– राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ % एवढा आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२,२२,४८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,३०,५९९ (१८.८६ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत.
– सध्या राज्यात ६,४९,२६३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४८,१९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)