coronavirus in maharashtra: Coronavirus in Maharashtra: राज्यात करोना रुग्णसंख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा; आज २९५ बळी – maharashtras covid 19 case tally crosses two lakh with record single day spike of 7074 new cases

0
21
Spread the love

मुंबई: राज्यात दररोज करोना साथीचे नवे उच्चांक नोंदवले जात आहेत. आज करोनाच्या आणखी २९५ बळींची नोंद झाली तर त्याचवेळी ७०७४ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली असून राज्यातील करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. ( Coronavirus in Maharashtra )

वाचा: पुण्यातून मोठी बातमी; महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना

राज्यात आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,०८,०८२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०२ % इतके झाले आहे. आज राज्यात ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू त्याआधीच्या कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

वाचा: शिर्डीचं साई मंदिर उघडल्यावर आता दर्शनासाठी ‘हे’ असतील नियम

राज्यात करोनामृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या ८६७१ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील असून हे मृत्यू मुंबई मनपा-६८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-४, जळगाव-३, जळगाव मनपा-४, पुणे-१, पुणे मनपा-७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-४, सोलापूर मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-३, लातूर मनपा-१, अकोला-२, अकोला मनपा-१, यवतमाळ-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; ज्येष्ठ नगरसेवकाचे करोनाने निधन

दोन लाखाचा टप्पा ओलांडणारं पहिलं राज्य

करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी २४ तासांतील रुग्णसंख्येचा फुगत चाललेला आकडा आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारा आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७०७४ नवे रुग्ण आढळले. हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. आणखी चिंतेची बाब म्हणजे दोन लाख रुग्णसंख्येचा टप्पा पार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बनलं आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आज २ लाख ६४ इतका झाला. त्यात सध्या प्रत्यक्षात ८३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)