coronavirus in mumbai: करोना लढ्यात टाटांचा पुन्हा मदतीचा हात; पालिकेला दहा कोटींची आर्थिक मदत – 10 crore, 20 ambulances and 100 ventilators given by tata group to bmc in the war against corona

0
26
Spread the love

मुंबई: आपल्या औदार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा ग्रुपने करोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक औदार्य दाखवले आहे. मुंबई महापालिकेला करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये, १०० व्हेंटिलेटर आणि २० रुग्णवाहिका दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी हे सर्व सुपूर्द करण्यात आले आहे. (Tata Helps Bmc)

करोनाच्या संकटात मुंबई महापालिका आणि टाटा ग्रुप प्लाझ्मा प्रकल्पावर एकत्रित काम करत आहेत. या प्रकल्पासाठी ही भरीव मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालय व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.

अर्शद वारसीचं वक्तव्य बेजाबदारपणाचे; ‘अदानी’कडून कानउघडणी

मुख्यमंत्र्यांनी याबाबत टाटा ग्रुपचे आभार मानले असून ग्रुपचे कौतुक केले आहे. करोनाच्या संकटात समाजाच्या सर्वच स्तरातून मदत मिळते आहे. टाटा ग्रुपसारख्या मोठ्या संस्थेकडून जेव्हा मदत मिळते तेव्हा काम करण्याचा उत्साह आणखी वाढत जातो. या सदिच्छांच्या जोरावर आपण करोनाविरोधातील लढा नक्कीच जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

वाचाः राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स व लॉज सुरू होणार; पण या असतील अटी

करोना काळात पहिल्या दिवसांपासून मदतकार्यासाठी टाटा समुहाचा राहिला आहे. आताही त्यांनी २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटींचे अर्थसहाय्य दिले आहे. खरं तर हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो, असं म्हणतं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टाटा समुहाचे आभार मानले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)