Coronavirus in pune: पिंपरीत मृत्यूदर वाढताच; सरकारी-खासगी रुग्णालय ‘फुल्ल’ – pimpri-chinchwad’s mortality rate lower than that of pune

0
22
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये करोना साथीचे थैमान सुरूच असून, रुग्णसंख्येबरोबर समस्यांतही वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी (तीन जुलै) शहरात सर्वाधिक सात जणांचे मृत्यू झाले आहेत. शिवाय सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शहरातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या रुग्णांमुळे चिंतेत भर पडली आहे. आजपर्यंत शहरातील ३ हजार ७३५ जणांना करोनाची लागण झाली असून, सक्रीय रुग्णसंख्या मोठी आहे. मृत्यू दराचे प्रमाणही हळूहळू वाढू लागले आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि करोनासह विविध आजार असलेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. (coronavirus update in pune)

राज्यात आज उच्चांकी ६ हजार नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित आहे. त्यासह अन्य सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे सकारात्मक अहवाल असूनही सौम्य लक्षणे असल्यास रुग्णास घरी राहून उपचार घेण्याचा सल्ला मिळत आहे. त्यातून अनेकजण बरेदेखील होत आहेत. मात्र, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. प्रतिकार शक्ती कमी असलेले, फुफ्फुस, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार असे गंभीर आजार असलेले आणि करोनाचे लागण झालेले रुग्ण दगावत आहेत. उपचारासाठी विलंबाने दाखल होत असल्यामुळेही मृत्यूसंख्येत वाढ होत आहे. या बाबी चिंतेच्या आहेत. त्यामुळे परिस्थितीशी लढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

यंदा ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची मूर्ती घडवणार नाही, मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

एक लाख अँटिजेन किटच्या माध्यमातून लवकर निदान करण्याचे प्रयत्न होत आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब कार्यान्वित करण्यात आली असून, या ठिकाणी जलद गतीने कामकाज केले जाणार आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी कडक निर्बंध लादण्याबाबत निर्णय घेतले जात आहे. या प्रयत्नांना नागरिकांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुन्हा लॉकडाउनची मागणी

शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आणि भविष्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुन्हा लॉकडाउन जाहीर करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होऊ लागली आहे. माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला विनंती केली आहे.

करोना रुग्णांची सद्यःस्थिती

आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या – ३,७७६
सक्रीय रुग्णसंख्या – १,४८२
बरे झालेले रुग्ण – २,२३३
शहरातील मृत्यू – ५३
शहराबाहेरील मृत्यू – ३२
मृत एकूण व्यक्ती – ८५

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)