Coronavirus in pune: Coronavirus In Pune: पुण्याचं टेन्शन वाढलं; २४ तासांत ३१ करोनाबळी, ११६८ नवे रुग्ण – spike continues as 1168 new covid cases found in pune district

0
18
Spread the love

पुणे: पुणे शहर जिल्ह्यात शनिवारी ११६८ जणांना करोना संसर्गाची लागण झाली. त्यामुळे रुग्णसंख्येने २७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर पुणे शहर जिल्ह्यात २४ तासांत एकूण ३१ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ८५८ वर पोहोचली आहे. Coronavirus In Pune

पुणे शहरात आज १९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये ९ तर पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच नगरपालिका हद्दीत एकाचा असे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात शनिवारी ३९९ रुग्ण बरे झाल्याने रुग्णसंख्या वाढत असताना बरे झालेल्यांची संख्या वाढल्याने दिलासा मिळत आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या १२ हजार ६८९ झाली आहे. सध्या प्रत्यक्षात ७२७६ एवढे रुग्ण सक्रिय आहेत. त्यात ३८५ रुग्ण गंभीर असून त्यापैकी ३२९ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५६ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

महापौरांना करोना

पुण्याला करोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या लढ्याचे नेतृत्व करत असलेले पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाच आता करोनाने गाठले आहे. मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली असून याबाबत खुद्द मोहोळ यांनीच जाहीरपणे माहिती दिली आहे. मोहोळ यांनी एक ट्विट केलं असून त्यात आपल्याला करोना संसर्ग झाल्याचे नमूद केले आहे. थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड १९ टेस्ट केली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे मोहोळ यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. मोहोळ यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांची धडक कारवाई

पुणे शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी पुन्हा जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. शनिवारी दिवसभरात १ हजार ११५ जणांवर कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रात नियमभंग करणाऱ्यांवर आणखी कडक कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे निधन

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनाने निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. भोसरीतील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. मात्र, शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन फौजदार आणि सहा कर्मचारी यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शुक्रवारी तिघांना लागण झाली होती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)