Coronavirus Lockdown announced in Aurangabad sgy 87 | औरंगाबादमध्ये पुन्हा लॉकडाउन जाहीर

0
19
Spread the love

राज्यात एकीकडे ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करुन पुन्हा एकदा अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न सुरु असताना अनेक ठिकाणी मात्र लॉकडाउन जाहीर केलं जात आहे. भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मीरा भाईंदर, रत्नागिरी, नवी मुंबई यांच्यासह अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहीर झालेला असताना आता औरंगाबादमध्येही लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून १० ते१८ जुलैदरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत.

मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १५० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या तब्बल ६६८० वर पोहोचली आहे. सोमवारी आढळलेल्या १५० करोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहरातील १०१ व ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ८५ पुरुष ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत आढळलेल्या ६६८० करोनाबाधितांपैकी ३३७४ रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. ३१९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, करोनामुळे आतापर्यंत ३१० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 1:56 pm

Web Title: coronavirus lockdown announced in aurangabad sgy 87


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)