Coronavirus Update India: करोनाः देशात २४ तासांत २२ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर – coronavirus update india record cases of corona in the country

0
16
Spread the love

नवी दिल्लीः केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नांनंतरही देशात करोनाचा प्रादुर्भाव थांबत नाहीए. करोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत करोनाचे २२, ७५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ तासांत एकूण ६१० जणांना करोनाने मृत्यू झाला आहे. देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख ७२ हजार ६४४ इतकी झाली आहे. तर या आजाराने एकूण १९, २७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात करोनाच्या २,४४,७४० जणांवर उपचार सुरू आहे. तर ४, ०८,६५२ जण करोनामुक्त झाले आहेत. शनिवारी अनेक राज्यांमध्ये करोनाचे विक्रमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

दिल्लीत २५०५ नवीन रुग्ण

दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिल्लीत २५०५ इतके विक्रमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका दिवसात करोनाने ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही आता ९७, २०० इतकी झाली आहे. एक ते दोन दिवसांत हा आकडा लाखावर जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत आतापर्यंत करोना व्हायरसचे ६८, २५६ जण करोनामुक्त झालेत. तर ३००४ जणांना करोनाने मृत्यू झाला आहे. दिल्लीत करोनाच्या २५, ९४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तामिळनाडूत ४ हजार नवे रुग्ण

तामिळनाडूत सलग तिसऱ्या दिवशी करोनाचे ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाखांवर गेलीय. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही १.०७ इतकी झालीय. शनिवारी ६५ रुग्णांचा करोनाने मृत्यू झालाय. यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या १४५० इतकी झालीय.

१५ ऑगस्टपर्यंत करोनावरील लसच्या दाव्यावर सवाल, ICMR ने दिलं हे स्पष्टीकरण

गुजरातमध्ये ७१२ नवे रुग्ण २१ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत ७१२ नवे रुग्ण आढळेत. पण त्याचबरोबर २१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३५, ३९८ इतकी झाली आहे. यापैकी २५, ४१४ जण करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण १९७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

… यामुळे मुंबई – कोलकाता विमान सेवा ६ जुलैपासून बंद

कर्नाटकात २४ तासांत १८३९

कर्नाटकातही करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कर्नाटकात गेल्या २४ तासांत १८३९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. यानुसार राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ११,९६६ इतकी झालीय. तर मृतांची एकूण संख्या ३३५ इतकी झाली आहे.

करोनाला घाबरू नकाः आरोग्य राज्यमंत्री

देशातील नागरिकांनी करोना व्हायरसला घाबरू नये. चाचणीचा वेग रोज वाढवण्यात येत आहे. सध्या दिवसाला २ लाख ५० हजार इतक्या चाचण्या होत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात करोनाच्या संकटात भारतात उत्तम काम सुरू आहे. सध्या ७८० सरकारी आणि ३०७ खासगी लॅबद्वारे चाचण्या करण्यात येत आहेत. करोना रुग्णं बरे होण्याचा दर हा ६०.८० टक्यांवर गेला आहे. केंद्र आणि राज्य सरकार उत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी शनिवारी सांगितलं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)