Crime against newspaper vendor in Bhayander giving reason for crowd abn 97 | गर्दीचे कारण देत भाईंदरमधील वृत्तपत्र विक्रेत्यावर गुन्हा

0
29
Spread the love

घरोघरी वर्तमानपत्र विकण्यास शासनाने परवानगी दिलेली असताना भाईंदर शहरातील एका वृत्तपत्र विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पालिका मुख्यालयाच्या बाहेरच ते वृत्तपत्र विकत असत. त्या ठिकाणी गर्दी होत असल्याचे कारण देत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर शहरातील महापालिका मुख्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर प्रशांत केळवण यांचा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल आहे. टाळेबंदीत त्यांचा स्टॉल काहीकाळ बंद केला होता. ७ जून रोजी राज्य शासनाच्या आदेशानंतर पालिकेने वृत्तपत्र विक्रीला परवानगी दिली आहे. त्यानतर केळवण यांनी पुन्हा या ठिकाणी वृत्तपत्र विक्री सुरू केली होती.

रविवारी अचानक भाईंदर पोलिसांनी केळवण यांच्यावर वृत्तपत्र विक्रीच्या वेळी गर्दी होत असल्याचे कारण देत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलन १८८ अन्वये गुन्हा दाखल केला. परवानगी असल्याचे शासन आदेश दाखवूनदेखील पोलिसांनी ही कारवाई केली, असे केळवण यांनी सांगितले. पोलिसांच्या या कृतीमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संताप आहे.

पालिका आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिल्याने ही कारवाई केल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली. पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी मात्र गर्दीमुळे नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. वृत्तपत्र विक्रीला कुठलाही बंदी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:46 am

Web Title: crime against newspaper vendor in bhayander giving reason for crowd abn 97


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)