Dagdusheth Ganpati: Dagdusheth Ganpati मराठा बटालियनची अपार श्रद्धा; काश्मीरमध्ये दगडूशेठ विराजमान! – dagdusheth ganpati temple in jammu and kashmir

0
33
Spread the love

पुणे: सहा मराठा बटालियनमधील मराठी जवानांच्या कुटुंबांनी जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे बांधलेल्या मंदिरात ‘ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ‘ची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आली. ( Dagdusheth Ganpati in Jammu and Kashmir )

पाहाः ‘हे’ आहेत जुलै महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

गुरेज सेक्टर कंजलवान या गावी सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरासाठी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती मूर्ती द्यावी, अशी मागणी कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे केली होती. त्यानंतर दगडूशेठ गणपतीची ३६ इंचाची प्रतिकृती मूर्ती
पुण्याचा तरुण शिल्पकार विपुल खटावकरने बारा दिवसात घडवली. श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांचा मुलगा विपुल
शिल्पकलेत तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे.

‘हा’ उपाय कितीही मोठ्या समस्येवर ठरू शकतो रामबाण; वाचा

कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी मनापासून व उत्साहाने योगदान दिले. मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा चार ते पाच फूट इतका बर्फ होता. पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बारा फुटांपर्यंत बर्फ होता. अशा परिस्थितीत मंदिर उभे राहिले. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी ‘चीड’ या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे.’ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘२०११ पासून ‘ ६ मराठा बटालियन ‘सोबत आमचं जिव्हाळ्याचे नाते आहे. दगडूशेठ गणपती मंदिराने पाठवलेली मूर्ती मंदिरात विराजमान झाली आहे.’

CM ठाकरेंचा पुण्याचे महापौर मोहोळ यांना फोन; दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)