Daily Horoscope Astrology In Marathi Sunday 12th July 2020 Scj 81| आजचे राशीभविष्य, रविवार, १२ जुलै २०२०

0
51
Spread the love

मेष:-सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ:-उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

मिथुन:-वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क:-स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

सिंह:-कौटुंबिक बाबीत गैरसमजाची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांचे विचार जाणून घ्या.

कन्या:-रेस, जुगारापासून दूर राहावे. कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने निर्धारित कामे पूर्ण कराल. नाहक खर्च होण्याची शक्यता.

तूळ:-कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

वृश्चिक:-बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.

धनू:-मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करावा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.

मकर:-परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार आमलात आणा. समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा.

कुंभ:-रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मीन:-मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घालावी.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 12:46 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 12th july 2020 scj 81



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)