deepika padukone has more than 50 million followers on instagram ssj 93 |लोकप्रियतेत दीपिका आघाडीवर; इन्स्टाग्रामवर झाले ५ कोटी फॉलोअर्स

0
23
Spread the love

बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणने निखळ हास्य आणि दमदार अभिनय शैली यांच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज दीपिका अनेकांच क्रश असल्याचं पाहायला मिळतं. लोकप्रियतेच्या शिखरावर असेलल्या या अभिनेत्रीचा केवळ देशातच नाही, तर विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपिका सोशल मीडियावर सक्रीय असते. विशेष म्हणजे दिवसेंदिवस दीपिकाच्या चाहत्यांची संख्या वाढत असून नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर ५ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे.

दीपिकाने काही वेळापूर्वीच इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत तिचे ५ कोटी फॉलोअर्स पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. सोबतच तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. इतकंच नाही तर तिने त्याचा फॅन क्लबचेही आभार मानले आहेत.

दरम्यान, दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. सध्या लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं चित्रीकरण रखडलं आहे. मात्र या काळातही दीपिका घरी राहून तिच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यात वेळ घालवत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 9:56 am

Web Title: deepika padukone has more than 50 million followers on instagram ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)