Devendra Fadnavis : आमचं राजकारण त्यांच्यासारखं नाही, ते घरात बसलेत-फडणवीस – Jalgaon: Opposition Leader Devendra Fadnavis Slams Congress-Ncp

0
19
Spread the love

म. टा. प्रतिनिधी । जळगाव

‘सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौऱ्यावर कीतीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणी तरी आमची दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, आम्ही राजकारण जनतेकरीता करतो’, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हाणला.

संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान! ‘सारथी’च्या बैठकीत राडा

करोनाचा आढावा घेण्यासाठी जळगाव दौऱ्यावर आले असता फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस यांनी सुरुवातीला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून करोना रुग्णांच्या उपचाराबाबत आढावा घेतला. त्यानतंर फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी करोना संसर्ग, बाधितांचा वाढता मृत्यूदर व संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेऊन टेस्टिंग वाढविण्याबाबत सूचना केल्या.

‘एक नारद, शिवसेना गारद’; फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

जळगावामध्ये आणखी उपाययोजनांची गरज

‘जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. सध्या प्रमाणापेक्षा कमी टेस्टिंग होत असल्याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. टेस्टिंग वाढविण्यासाठी उपाययोजना केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. यासह टेस्टिंगचे अहवाल चार चार दिवस येत असल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. २४ तासांत अहावाल येणे आवश्यक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. रुग्णालयाच्या शौचालयात मृत्यू होत आहेत. रुग्णवाहिका कमी असल्याने देखील मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका वाढविण्याची मागणीही आम्ही केली. जेवणाची व्यवस्था उशिरा होते. वेळेवर डिझेल मिळत नाही अशा तक्रारी असल्याचेही ते म्हणाले.

Live: बाळासाहेब थोरात यांची करोना चाचणी निगेटिव्ह

नान कोविड रुग्णांची समस्या मोठी

जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांपेक्षा बिगर कोविड रुग्णांची समस्या मोठी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शासकीय रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय असल्याने नानकोविड रुग्ण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविले जातात. तेथे त्यांचे हाल होतात, तसेच मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

maharashtra times

ऑनलाइन शिक्षण ठीक, पण…

आनलाइन शिक्षण देणे ठीक आहे. पण अनेक जण या शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे याचा देखील विचार करण्याची गरज आहे. अन्यथा मोठी विसंगती यातून तयार होईल, याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)