Devendra Fadnavis: Devendra Fadnavis फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; कुणीही जखमी नाही – accident to devendra fadnavis convoy no one was injured

0
25
Spread the love

जळगाव:करोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा करत असलेले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाला आज अपघात झाला. ही घटना रात्री आठ वाजता जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. ( Accident To Devendra Fadnavis Convoy )

वाचा : करोनाची आकडेवारी लपवल्याने मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात: फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. नाशिक जिल्ह्याचा दौरा आटोपून ते भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आज रात्री यावल तालुक्यातील भालोद येथे निघाले होते. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ मुसळधार पावसामुळे त्यांच्या ताफ्यातील एका वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे नियंत्रण सुटलेले वाहन पुढील वाहनाला धडकले. या वाहनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बसलेले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातानंतर प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसून पुढील प्रवासाला निघाले.

वाचा: हे कसं घडलं? पारनेरचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत

दरम्यान, नाशिक आणि मालेगावचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला आहे. स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही, अशी माहिती फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

हरिभाऊंच्या कुटुंबाचे सांत्वन

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भालोद येथे जाऊन माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. हरिभाऊंच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाली आहे, आम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी फडणवीस यांच्या सोबत प्रवीण दरेकर, माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

वाचा: राज्यात आज १९८ करोनाबळी; ‘हा’ टक्का थोडासा दिलासा देणारा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)