Devendra Fadnavis in Jalgaon: Devendra Fadnavis: जळगावात फडणवीसांचे जंगी स्वागत; सगळे नियम पायदळी – thousands of bjp workers defy lockdown to welcome opposition leader devendra fadnavis in jalgaon

0
25
Spread the love

म. टा. प्रतिनिधी । जळगाव

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जामनेर तालुक्यातील पहूर जवळ रस्त्यावर हजारोंच्या संख्येने माजी मंत्री गिरिश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यकर्ते नुसते गर्दी करून थांबले नाहीत, तर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन देखील केले. ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बेशिस्तीने जमावबंदी आदेशासह सुरक्षित वावराचे सर्व नियम अक्षरशः पायदळी तुडवले. (Grand welcome of Devendra Fadnavis in Jalgaon)

‘सारथी’चं सारथ्य आता मराठा मंत्र्याकडे; वडेट्टीवारांनी सांगितलं कारण

करोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी ते जळगावातील दौरा आटोपून औरंगाबादला जात होते. फडणवीस रस्त्याने पहूरमार्गे औरंगाबादला जाणार होते. याची माहिती मिळताच माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पहूर येथे रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी हातात फडणवीस यांना समर्थन देणाऱ्या घोषणांचे बॅनर घेतले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फडणवीस पहूर येथे पोहचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीला गराडा घातला. यावेळी पोलिसांची गर्दीला आवरताना तारांबळ उडाली. यावेळी थोडी धक्काबुक्कीही झाली. हा सारा गोंधळ पाहून फडणवीस स्वागत स्वीकारून पुढे मार्गस्थ झाले.

Live: मुंबईतील नॅशनल पार्कमधील वाघाचा कॅन्सरने मृत्यू

फडणवीस पहूरला पोहचण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर एकत्र झाले होते. अशा परिस्थितीत जमावबंदी आदेश लागू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवले का नाही, विनाकारण गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाई का केली नाही ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जखमी प्रवीण दरेकरांनी काढला एक्स-रे; म्हणाले, चिंता नाही!

संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान! ‘सारथी’च्या बैठकीत खडाजंगी
आमचं राजकारण त्यांच्यासारखं नाही, ते घरात बसलेत; फडणवीसांची टोलेबाजी

maharashtra times

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)