dil bechara director mukesh chabra says that everything changed avb 95

0
28
Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आतापर्यंत ८ मिलियन लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. तसेच ट्रेलर प्रदर्शित होताच २४ तासात सर्वाधिक लाइक्स मिळाले असून याबाबतीत ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’लाही मागे टाकले आहे. आता चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते. त्या विषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबरा भावूक झाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी ९ जुलै रोजी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. ‘९ जुलै. दोन वर्षांपूर्वी जमशेदपूर येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते. आता सर्व काही बदलले आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘दिल बेचारा’ चित्रपटाचा ट्रेलर ६ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच चित्रपट २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. तसेच अभिनेता सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 8:39 am

Web Title: dil bechara director mukesh chabra says that everything changed avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)