dil bechara trailer sushant singh rajput fans plan to break record by making 100m views in 24 hours ssj 93 | ‘दिल बेचारा’चा ट्रेलर ‘सुपर-डुपर हिट’; मिळाले सर्वाधिक व्ह्यूज

0
62
Spread the love

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या करत जीवनाचा अंत केला. त्यामुळे ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही काळात या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्युज मिळाले असून कमी कालावधीत सर्वाधिक व्ह्युज मिळविणारा हा ट्रेलर ठरला आहे.

सोमवारी प्रदर्शित झालेल्या ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरला अवघ्या २४ तासांमध्ये २०० दशलक्षापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहे. विशेष म्हणजे तीन मिनीटांच्या या ट्रेलरला अवघ्या तासाभरात तब्ब्ल पाच दशलक्षापेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे. त्यामुळे कमी कालावधीत सर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला हा ट्रेलर ठरला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून किझी आणि मॅनी यांची प्रेमकथा थोडक्यात उलगडण्यात आली आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकथा नाही,यात अनेक चढउतार आहे. विशेष म्हणजे संजयनाचा हा पहिलाच चित्रपट असला तरीदेखील तिच्या अभिनयाची छाप पडल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यामुळे ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. म्हणूनच हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करावा अशी मागणी चाहत्यांनी केली होती. परंतु लॉकडाउनचा काळ असल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 9:28 am

Web Title: dil bechara trailer sushant singh rajput fans plan to break record by making 100m views in 24 hours ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)