district administration immediately provided Rs 1 crore to NMC zws 70 | महापालिकेला एक कोटीची मदत

0
19
Spread the love

भाजपच्या तक्रारीनंतर करोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून निधी

नाशिक : शहरात करोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने महापालिकेला एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिका स्वखर्चातून करोनाचा प्रतिकार करत आहे. याआधी शासनाने आपत्ती निवारणार्थ ५० लाखांचा निधी दिला होता. आता एक कोटीच्या निधीसोबत करोना प्रतिबंधक उपायांची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांची सेवा महानगरपालिकेस उपलब्ध करण्यात आली आहे.

भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे मांडला होता. शहर, परिसरात मोठय़ा प्रमाणावर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या अडीच हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. करोना नियंत्रणासाठी शासनाने आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी दिला. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी अधिकच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी लागणारा खर्च महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेस द्यावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली होती. यानंतर प्रशासनाने जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून पुन्हा एक कोटीचा निधी उपलब्ध केला. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले विलगीकरण कक्ष स्थापन करणे, त्यासाठी तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल आणि उपाययोजनांसाठी जिल्ह्य़ास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून रक्कम देण्यात येते. त्यातून ५० लाखांचा निधी यापूर्वीच नाशिक महानगरपालिकेस देण्यात आला होता. आता पुन्हा एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेस वितरित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील वाढत्या रुग्णसंख्येचे आव्हान जिल्हा प्रशासन पेलत असतानाच महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाढत्या करोना संसर्गास आळा घालण्याच्या दृष्टीनेही अनेकविध उपाययोजना केल्या जात आहेत. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे क्षेत्रीय स्तरावर होण्यासाठी पुरेसे पर्यवेक्षकीय अधिकारी नेमणे आवश्यक आहे. या संदर्भात पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जिल्हा प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांच्या सेवा महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे महापालिकेच्या करोना नियंत्रण मोहिमेला अधिक बळ मिळणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.

महापालिकेला जादा कुमक

करोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता प्रवीण खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी हेमंत अहिरे यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:40 am

Web Title: district administration immediately provided rs 1 crore to nmc zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)