Do you know Rahul Dravid has faced more balls than anyone else in Test cricket | द्रविडला तोड नाही… ICCने शेअर केली खास आकडेवारी

0
21
Spread the love

भारतीय संघात कायम उत्तमोत्तम खेळाडूंचा भरणा असतो. अनेकदा सध्याचा संघ चांगला की आधीचा संघ चांगला? यावर चर्चा रंगते. तसेच एखाद्या पिढीत कोण श्रेष्ठ यावरही वाद-विवाद रंगतो. कोहली श्रेष्ठ की रोहित, हा जसा सध्याच्या पिढीतील चर्चेचा विषय असतो. तसाच काहीसा विषय या आधीच्या संघांमधील खेळाडूंच्या बाबतीतही होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड अशा दिग्गज खेळाडूंच्या बाबतीत ही चर्चा अनेकदा रंगलेली क्रिकेटप्रेमींना आठवत असेल. पण माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने एक असा पराक्रम करून ठेवला आहे, जो भारताच्याच नव्हे, तर जगातील कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही.

राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेला खेळाडू आहे. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ३१ हजार २५८ चेंडू खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ३० हजारांहून अधिक चेंडू खेळलेला राहुल द्रविड हा एकमेव खेळाडू आहे. द्रविडने प्रत्येक सामन्यात सरासरी सुमारे १९१ चेंडू खेळले आहेत. ICCने राहुल द्रविडचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी ही आकडेवारी देण्यात आली आहे.

द्रविडने हा पराक्रम १६४ सामन्यांमध्ये आणि २८६ डावांमध्ये केला आहे. १९९६ ते २०१२ या कालावधीत त्याने एकूण १३ हजार २८८ धावा केल्या. त्यात २७० धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. कसोटी कारकिर्दीत त्याने ३६ शतके आणि ६३ अर्धशतके ठोकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:02 pm

Web Title: do you know rahul dravid has faced more balls than anyone else in test cricket vjb 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)