Eng vs WI 1st Test Southampton Day 2 Updates | Eng vs WI : गॅब्रिअल-होल्डरचा यजमानांना दणका, निम्मा संघ माघारी

0
19
Spread the love

शेनॉन गॅब्रिअल आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विंडीजच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला. दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे इंग्लंडकडून किल्ला लढवत आहेत.

१ बाद ३५ वरुन इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु केला. गॅब्रिअलने आपला भेदक मारा सुरु ठेवत जो डेनली आणि रोरी बर्न्स यांना माघारी धाडलं. लागोपाठ बसलेल्या धक्क्यांमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. यानंतर झॅक क्रॉली आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार होल्डरने क्रॉली आणि पोप यांना झटपट माघारी धाडत इंग्लंडला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकललं. ८७/५ अशा बिकट परिस्थितीत अडकलेल्या इंग्लंडसाठी पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू धावून आले.

बेन स्टोक्स आणि जोस बटलरने उरलेल्या सत्रातील षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडला शंभर धावांचा पल्ला ओलांडून दिला. इंग्लंडचे सलामीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे पुन्हा एकदा मधल्या फळीवर डाव सावरण्याची जबाबदारी आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 5:47 pm

Web Title: eng vs wi 1st test southampton day 2 updates psd 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)