eng vs wi test jofra archer swings the ball and takes wicket of kraigg brathwaite clean bowled see video | Video : आर्चरचा स्विंग अन् ब्रेथवेटची झाली दांडी गुल

0
21
Spread the love

इंग्लंडचा दुसरा डाव सामन्याच्या पाचव्या दिवशी ३१३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडला पाचव्या दिवशी केवळ २९ धावांचीच भर घालता आली. जोफ्रा आर्चरने काही काळ झुंज दिल्यानंतर तो २३ धावांवर माघारी परतला आणि इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनेही उपहारापर्यंतच तीन गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट, शाय होप्स आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने सहावं षटक टाकत होता. क्रेग ब्रेथवेट आणि शाय होप दोघेही अतिशय संयमाने खेळत होते. पण षटकाच्या चौथ्या चेंडूवर आर्चरने आपली जादू दाखवली. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या रेषेत असलेला चेंडू त्याने इन-स्विंग केला. त्याचा स्विंग ब्रेथवेटला नीट समजला नाही. त्याने चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळला, पण त्यात चेंडू बॅटला लागला. त्यानंतर चेंडू दोन पायांच्या मध्ये टप्पा पडून स्टंपवर आदळला आणि तो त्रिफळाचीत झाला.

या घटनेनंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला. जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. त्याला खेळताना दुखापत झाली. त्यामुळे गरज पडली तरच तो फलंदाजीस उतरेल अशी माहिती विंडिज क्रिकेट बोर्डाने दिली.

दरम्यान, इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर रॉरी बर्न्सदेखील चांगला खेळ करत होता, पण अर्धशतकाच्या नजीक येताना ४२ धावांवर तो रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सिबलीने डेन्टलीच्या साथीने धावा करणं सुरू ठेवलं. उपहारापर्यंत इंग्लंडने १ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली. सिबली ५० धावांवर माघारी परतला, तर डेन्टली २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी केली हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर इतर फलंदाज झटपट बाद झाले. जोफ्रा आर्चरने (२३) काही काळ झुंज दिली. पण इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या. गॅब्रियलने ५, होल्डर-चेसने प्रत्येकी २ तर होल्डरने १ बळी टिपला.

त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात शतकी आघाडी घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 6:51 pm

Web Title: eng vs wi test jofra archer swings the ball and takes wicket of kraigg brathwaite clean bowled see video vjb 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)