eng vs wi test match day 5 updates ben stokes jason holder shannon gabriel zak crawley jofra archer raise the bat test series | ENG vs WI : करोनानंतरची पहिली कसोटी रंगतदार स्थितीत

0
31
Spread the love

पहिल्या डावात वेस्ट इंडिजने शतकी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव सामन्याच्या पाचव्या दिवशी ३१३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडला पाचव्या दिवशी केवळ २९ धावांचीच भर घालता आली. क्राव्हली (७६), सिबली (५०) यांची अर्धशतके आणि कर्णधार स्टोक्सची दमदार खेळी (४६) यांच्या बळावर इंग्लंडने २८४ धावा गाठल्या होत्या. त्यानंतर पाचव्या दिवशी मार्क वूड २ धावांवर तर जोफ्रा आर्चर २३ धावांवर माघारी परतला आणि इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले. शॅनन गॅब्रियलने पाच बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनेही झटपट तीन गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट, शाय होप्स आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. तर जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. आता गरज पडली तरच तो फलंदाजीस उतरेल अशी माहिती विंडिज क्रिकेट बोर्डाने दिली.

इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर रॉरी बर्न्सदेखील चांगला खेळ करत होता, पण अर्धशतकाच्या नजीक येताना ४२ धावांवर तो रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सिबलीने डेन्टलीच्या साथीने धावा करणं सुरू ठेवलं. उपहारापर्यंत इंग्लंडने १ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली. सिबली ५० धावांवर माघारी परतला, तर डेन्टली २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी केली हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर इतर फलंदाज झटपट बाद झाले. जोफ्रा आर्चरने (२३) काही काळ झुंज दिली. पण इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या. गॅब्रियलने ५, होल्डर-चेसने प्रत्येकी २ तर होल्डरने १ बळी टिपला.

त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली. अखेर स्टोक्सने (४३) जोस बटलर (३५) आणि डॉम बेस (३१*) यांच्या साथीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. होल्डरने ६ तर गॅब्रियलने ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. रॉस्टन चेसनेही चांगली खेळी करत ४७ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्रिशतकी मजल मारली. स्टोक्सने ४, अँडरसनने ३, बेसने २ तर मार्क वूडने १ गडी बाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 6:03 pm

Web Title: eng vs wi test match day 5 updates ben stokes jason holder shannon gabriel zak crawley jofra archer raise the bat test series vjb 91



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)