ENGvWI: चार महिन्यांनंतर उद्या रंगणार पहिला क्रिकेटचा सामना – first international cricket match will be start from tomorrow after corona virus

0
23
Spread the love

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्रिकेटचा करोनानंतरचा पहिला सामना उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहीलेली आहे.

वाचा-खूष खबर… आता दुपारी ३.३० वाजता सुरु होणार क्रिकेट सामना
करोना व्हायरसमुळे आतापर्यंत क्रिकेट ठप्प होते. १३ मार्चला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अखेरचा सामना खेळवला गेला होता. हा सामना खेळवून आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये चाहत्यांना एकही क्रिकेटचा सामना पाहता आलेला नाही. त्यामुळे आता उद्यापासून सुरु होणाऱ्या या सामन्याला चाहते कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

वाचा-प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण घडले असं काही…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने करोनामुळे स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना लाईव्ह सामन्यांचा आनंद घेता येत नव्हता. पण आता त्यांना लाईव्ह सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण आता क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने सुरु होणार आहेत आणि या सामन्यांचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे. सध्याच्या घडीला विश्वचषक होणार की नाही, हे जरी माहिती नसले तरी क्रिकेटची मालिका मात्र नक्की लवकरच खेळवली जाणार आहे. या क्रिकेट मालिकेचे थेट प्रसारण आता चाहत्यांना पाहता येणार आहे.

वाचा- निवृत्ती घेण्यापूर्वी धोनीने ‘या’ खेळाडूला दिली होती आपली जर्सी

चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच क्रिकेटची मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी मालिका ८ जुलै पासून सुरु होणार आहे. या मालिकेचे थेट प्रसारण भारतीय चाहत्यांना दुपारी ३.३० वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. तीन महिन्यांनंतर होणारा पहिला क्रिकेटचा सामना कसा असेल, याबाबत बऱ्याच चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या नियमांनुसार क्रिकेट कसे खेळवले जाणार आहे, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे आता तीन महिन्यांनंतर होणाऱ्या पहिल्या क्रिकेट सामन्याचे स्वागत चाहते कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)