Even when BJP and Shiv Sena were in power, there were differences says Sanjay Raut scj 81 | भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते-संजय राऊत

0
28
Spread the love

भाजपा आणि शिवसेनेचं सरकार याआधी राज्यात होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नाहीत. खटका हा शब्द प्रसारमाध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने खटका हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे हा खटका हा शब्द मीडियाने मनातून काढून टाकावा असाही सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांनाही उत्तरं दिली. पारनेरमध्ये जे नगरसेवक फुटले ते अजित पवारांनी फोडले असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच यापुढे असा काही मुद्दा असेल तर आपसात चर्चा करावी. हा मुद्दा अत्यंत स्थानिक पातळीवरचा होता. यावरुन मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना कोणताही फोन केलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 2:38 pm

Web Title: even when bjp and shiv sena were in power there were differences says sanjay raut scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)