Fire breaks out at a shopping centre at Borivali West in Mumbai aau 85 |मुंबई : बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग; १४ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

0
20
Spread the love

बोरिवली पश्चिम येथील एका शॉपिंग सेंटरला आज (शनिवार) सकाळी आग लागल्याचे वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या १४ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

ही भीषण आग लेव्हल ४ची असल्याने सकाळी आगीच्या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्याचबरोबर पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली. शॉपिंग सेंटर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बराच मोठा माल यात भस्मसात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, मोठ्या प्रमाणावर काळा धूर या परिसरात पसरला होता. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत काय आणि किती नुकसान झाले याचा तपशिल अद्याप मिळू शकलेला नाही.

दरम्यान, अशाच प्रकारे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मानखुर्द घाटकोपर लिंक रोड दरम्यान असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला सकाळी ६ च्या सुमारास आग लागली होती. ही आग लेव्हल ३ ची असल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली होती. या ठिकाणी स्क्रॅप करण्यात आलेल्या वस्तू आणि तेलाच्या डब्यांनाही आग लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 8:22 am

Web Title: fire breaks out at a shopping centre at borivali west in mumbai aau 85Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)