focus more on patient management and not on number management Devendra Fadnavis dmp 82| संख्येच्या नको, रुग्णांच्या व्यवस्थापनावर लक्ष द्या – देवेंद्र फडणवीस

0
27
Spread the love

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पनवेल दौऱ्यावर आहेत. त्यांनी पनवेलमधील करोना रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

“पनवेलमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४६ टक्के आहे. जून महिन्यात पनवेलमध्ये करोना रुग्ण मोठया प्रमाणावर वाढले आहेत” असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. ‘संख्येच्या व्यवस्थापनावर नको, तर रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या’ असे त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे.

फडणवीस यांनी पनवेल महापालिकेला सुद्धा भेट दिली व प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. पनवेलमध्ये गंभीर स्थिती असून जास्तीत जास्त चाचण्या हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “रुग्णांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाइन करणे, यानेच करोना व्हायरसचा फैलाव रोखता येऊ शकतो” असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 1:29 pm

Web Title: focus more on patient management and not on number management devendra fadnavis dmp 82



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)