fuel prices unchanged: दरवाढ टळली ; जाणून घ्या आजचा पेट्रोल -डिझेलचा भाव – petrol and diesel price unchanged today

0
23
Spread the love

मुंबई : लॉकडाउन शिथिल होताच किमान तीन आठवडे पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढविणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आंदोलनाचा चांगलाच धसका घेतला आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला. तर सलग नवव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

तेल वितरक कंपन्यांनी ७ जूनपासून दरवाढीचा सपाटा लावला होता. यावर नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. याशिवाय विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. गेल्या आठवड्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात रस्त्यावर आंदोलने झाली.

इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ रुपयांवर कायम आहे. तर डिझेलचा प्रती लीटर भाव ७९.०५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.७८ रुपये प्रती लिटर झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ७७.९१ रुपये आणि कोलकात्यात ७५.८९ रुपयांपर्यंत वाढले आहे.

छप्पर फाड़ के; करोना काळात भारतीय कंपनीने कमवले ९७ हजार ४०० कोटी!
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

सराफात दबाव : जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
सध्या जागतिक बाजारातला क्रूडचा भाव ४२ डाॅलरच्या आसपास आहे. त्यात १.३९ टक्क्याची घसरण झाली. क्रूडच्या किंमतीच्या तुलनेत देशातील पेट्रोल आणि डिझेल महागच आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा कर लादलेला आहे. कंपन्यांना आता इंधन दरात कपात करावी अशी मागणी केली जात आहे.

कर कपातीने होईल इंधन स्वस्त
देशभरात ही दरवाढ झाली असून प्रत्येक राज्याच्या मूल्यवर्धित करानुसार (व्हॅट) दोन्ही इंधनांचे दर बदलते राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या किरकोळ दरामध्ये करांचा वाटा एकूण दराच्या दोन तृतीयांश असतो. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)