Gadchiroli encounter: Gadchiroli Encounter गडचिरोलीत घातपाताचा मोठा कट उधळला; नक्षलवादी ठार – naxal killed by c 60 commandos in gadchiroli forest

0
27
Spread the love

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील एलदडमी जंगलात पोलिसांनी धाडसी कारवाई करत नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त केले आहे. यावेळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला आहे. आज संध्याकाळी ही चकमक झडली. ( Gadchiroli Encounter )

गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाने ही कारवाई केली. एलदडमीच्या जंगला नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती कमांडो पथकाला मिळाली होती. मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने हे शिबीर घेण्यात येत असल्याचेही सूत्रांकडून कळले होते. त्या पार्श्वभूमीवर घातपाताआधीच शिबीर उधळण्याची योजना पोलिसांनी आखली. त्यानुसार नियोजनबद्धरित्या धडक देऊन हे शिबीर उधळण्यात आले.

वाचा: गडचिरोलीत माओवाद्यांची दहशत; तरुणाला गावाबाहेर नेऊन घातल्या गोळ्या

सी-६० कमांडोंनी घेरल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. त्याला कमांडोनी चोख प्रत्युत्तर दिलं. सुमारे एक तास पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार मारण्यात यश आले. कमांडोचा जोरदार प्रतिकार लक्षात घेऊन अन्य नक्षलवाद्यांनी दाट जंगलात पळ काढला. कमांडोनी नंतर शोध घेतला असता ठार झालेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा वा नक्षलवादी चळवळीशी संबंधित साहित्य आढळून आलं आहे.

दरम्यान, गडचिरोली पोलिसांचं सी-६० हे कमांडो पथक जंगल भागात कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पथकाने अचूक माहितीच्या आधारे एलदडमी जंगलात कारवाई करून नक्षलवाद्यांना हादरा दिला. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात लगेचच शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाचा: गडचिरोली: माओवाद्यांनी वनविभाग कार्यालय पेटवलं; रक्षकांना मारहाण

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)