hand sanitizer machine: hand sanitizer machine: करोनाला रोखणार हे यंत्र? कोल्हापुरच्या तरुणीनं बनवलं मशीन – young engineers develop automatic hand sanitizer machine

0
62
Spread the love

कोल्हापूरः करोना संसर्गाला रोखण्यासाठी गेले तीन-चार महिने केमिकल आणि अल्कोहोल वापरून तयार केलेल्या सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पण त्याचा अतिवापर हानिकारक असल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगलोर येथील पाच विद्यार्थ्यांनी इ-सॅनिटायझर तयार केले आहे. या संशोधनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निपाणी येथील एका विद्यार्थिनीचा समावेश आहे.

गणेशोत्सव: सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे ‘ते’ टिपण अखेर रद्द

भारतात मार्चपासून करोनाचा कहर सुरू झाला. त्याला रोखण्यासाठी सतत सॅनिटायझरने हात धुवावे लागतात. यामुळे त्याचा वापर वाढला आहे. देशभरातील अनेक साखर कारखान्यांसह विविध डिस्टलरी व खासगी कारखान्यात देखील त्याचे उत्पादन घेतले जात आहे. देशभरात त्याचा वापर वाढल्याने पहिल्या टप्यात त्याचा तुटवडा निर्माण झाला. पण नंतर उत्पादकांची संख्या वाढली. मुळात या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल आणि केमिकलचा वापर होत असल्याने त्याचा अतिवापर धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भाजप खासदाराला करोना; कुटुंबातील ८ जणांचाही अहवाल पॉझिटिव्ह

लिक्वीड सॅनिटायझरला पर्याय म्हणून बेंगलोर येथील पाच विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये असलेल्या इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून स्टार्टअपचा हा उपक्रम राबवण्यात आला. या कॉलेजचा विद्यार्थी सिद्धारूढ अंगडी यांच्या नेतृत्वाखाली आरती लोहार, परिभाषा बांदेवर, अब्दूल रेहमान, संदेश शेट्टी या चार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या इ-सॅनिटायझर यंत्रात (विझक्लेन्झर) अल्ट्रा व्हायलेट ट्यूबचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये अल्कोहोल अथवा केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही. यातील लोहार ही मूळची निपाणी येथील आहे. ती सध्या अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिकत आहे.

हे मशिन पर्यावरणपूरक आहे. ओझोन तंत्रज्ञानाच्या तत्त्वावर कार्य करणारे हे सॅनिटायझर मशीन आहे. ते विजेवर चालते. केवळ काचेला हात लावल्यास पाच सेकंदात हात सॅनिटायझ होतो.

हे यंत्र पूर्णतः स्वयंचलित आहे. याशिवाय त्यावर फळे आणि भाज्यादेखील निर्जंतूक करण्याची सोय आहे. मे महिन्यात अटल इनोव्हेशन मिशन ( एआयएम)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवर अशा तंत्रज्ञानाबाबत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. आंध्रप्रदेशात अटल इनोव्हेशन सेंटरमध्ये ऑनलाइन झालेल्या स्पर्धेत या मशिनला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय त्याला एनएबी ( नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅन्ड कॅलिबरेशन लॅबोरेटरीज) ची मान्यता आहे. कमी खर्चाच्या या संशोधनाला सरकारची मान्यता मिळाल्याने लवकरच लिक्विड सनिटायझरच्या वापरापासून सुटका होणार आहे.

अतिशय कमी खर्चात आपले हात, फळे आणि भाज्या निर्जंतूक करण्याचे हे स्वयंचलित मशीन आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील प्रथमच या पद्धतीचे विजेवर चालणारे हे स्वयंचलित मशीन असल्याचे सुचंद्रा टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीनं म्हटलं आहे.

या मशिनचे फायदे

कोणतेही साइड इफेक्ट नाहीत

वापरातील एकदम सुलभता, खर्चही कमी

गतिमान निर्जंतुकीकरण

यंत्रासाठी विजेशिवाय कोणतेही अन्य साधन वापरावे लागत नाही.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)