Happy Bday Papa Ziva sings Que Sera Sera in adorable birthday video for MS Dhoni | लाडक्या बाबांसाठी झिवाने दिलं गोड गिफ्ट, व्हिडीओ पाहा… तुम्हीही प्रेमात पडाल

0
22
Spread the love

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करतो आहे. धोनी गेले अनेक महिने क्रिकेटपासून दूर असला, तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजिबात घट झालेली नाही. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटविश्वाने आणि चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. धोनीची लाडकी मुलगी झिवानेही आजच्या दिवशी आपल्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

झिवाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर, के सरा सरा हे गाणं आपल्या आवाजात म्हणत….धोनीसोबतचे सर्व लहानपणीचे फोटो टाकले आहेत. “Happy Bday Papa! This is for my Papa ! I love you ??” असं म्हणत झिवाने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का नाही, अशी चर्चा सध्या रंगली आहे. तसेच, IPL 2020 मध्येही धोनीचा फॉर्म कसा असेल, याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चेन्नईने लॉकडाउनआधी घेतलेल्या सराव सत्रात धोनीने तंदुरूस्ती सिद्ध केली होती. पण सध्या धोनी त्याचा क्रिकेटबद्दल काय विचार आहे हे धोनीकडूनच निश्चित समजू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 5:52 pm

Web Title: happy bday papa ziva sings que sera sera in adorable birthday video for ms dhoni psd 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)