Hardik Patel: हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी, भाजपला घेरण्याची तयारी – hardik patel appointed working president of gujarat pradesh congress committee with immediate effect

0
60
Spread the love

अहमदाबादः गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल हे काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. आता हार्दिक पटेल यांची काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे. तर अमित चावडा हे गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.

गुजरातमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. हार्दिक पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवत काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशाने हार्दिक पटेल यांची तात्काळ गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षण आंदोलन उभारले होते. यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि राजकारणात अधिक सक्रिय झाले. अनेकदा हार्दिक पटेल यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी २०१९मध्ये गांधीनगर इथे झालेल्या जाहीरसभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

महाराष्ट्रातील करोना स्थितीचा आढावा घ्या, जावडेकरांची शहांकडे मागणी

अनेक जिल्ह्यांच्या अध्यपदी नवीन नेते

हार्दिक पटेल यांची गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची नियुक्ती करतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. नवीन नेत्यांवर पक्षाची जबाबदारी सोनिया गांधी यांनी दिली आहे. महेंद्र सिंह परमार यांना आनंद, यासीन गज्जन यांना द्वारका आणि आनंद चौधरी यांची सूरत जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपला घेरण्यासाठी आणि राज्यातील ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने पक्षाची जबाबदारी तरुण असलेल्या हार्दिक पटेल यांच्यावर सोपवली आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या BAT चा हल्ल्याचा कट, LoC वर सुरक्षा दलांना हाय अलर्ट

हार्दिक पटेल यांचा जन्म हा २० जुलै १९९३ मध्ये गुजरातमधील एका पटेल कुटुंबात झाला. ३१ ऑक्टोबर २०१२ मध्ये हार्दिक पटेल यांनी पाटीदारांची युवा संघटना सरदार पटेल ग्रुपमध्ये (SPG) प्रवेश केला होता. यानंतर ते काही दिवसांतच वीरमगाम विभागाचे अध्यक्ष झाले होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)