hardik patel trolled: गुजरातमध्ये ‘असे’ सरकार बनवणार होते हार्दिक पटेल, ट्विटरवर झाले ट्रोल – gujarat congress working president hardik patel trolled

0
26
Spread the love

नवी दिल्लीः गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शनिवारी नियुक्ती झाल्यानंतर हार्दिक पटेल यांना सोशल मीडियावरील आपल्या ट्विटमुळे ट्रोल व्हावं लागललं. ट्विटमध्ये असं काही लिहिलं त्यामुळे अनेकांनी त्यांना चिमटे काढले. यानंतर हार्दिक पटेल यांना हे ट्विट डिलिट करावं लागलं. या ट्विटमध्ये त्यांनी २०२२ ला गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार बनवणार असं ते म्हणाले होते.

गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानं हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे आभार मानले. यासोबतच त्यांनी २०२२ ला एक तृतीयांश बहुमताने गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार बनवणार असंही लिहिलं होतं.

आदरणीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानतो. लोकशाही आणि राज्यघटनेच्या संरक्षणासाठी काँग्रेस लढतच राहील. गुजरातच्या विविध मुद्द्यांना महत्व दिले जाईल आणि २०२२ ला गुजरात विधानसभा निवडणुकीत १/३ बहुमताने काँग्रेस सत्तेत येईल, असं ट्विट हार्दीक पटेल यांनी केलं.

सत्ता स्थापनेसाठी निम्म्याहून अधिक जागा हव्यात

कुठल्याही राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षाला विधानसभेच्या एकूण जागांपैकी निम्म्याहून एक जागा जास्त असणं गरजेचं आहे.

एकाच मंडपात दोघींशी लग्न; एक गर्लफ्रेंड तर दुसरी….

पाकिस्तानी सैन्याच्या BAT चा हल्ल्याचा कट, LoC वर सुरक्षा दलांना हाय अलर्ट

डिलिट करावं लागलं ट्विट, नवी ट्विट केलं

हार्दिक पटेल यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलिट केलं. आणि नवीन ट्विट केलं. पण तोपर्यंत अनेकांनी त्यांचे आधीचे ट्विट डिलिट होण्यापूर्वी त्याचे स्क्रिन शॉट काढले होते.

आधी तुम्ही १/३ बहुमताने सत्ता स्थापन करणार होते. आता २/३ बहुमताने सरकार बनवणार आहात. खूप लवकर तुम्ही एवढे आमदार आणले, अशी टीका एका यूजरने केलीय. तर १/३ बहुमताचे सरकार येत म्हणून तुम्ही ट्विट डिलिट केले का? असा उपरोधिक सवाल दुसऱ्या एका युजरने केला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)